Maharashtra Rain Forecast : पुढील 3 तासांत ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज; पाहा पुढील तीन दिवस कुठे बरसणार

 

Maharashtra Rain Forecast नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला. अशा स्थितीत या आठवड्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. या दोन दिवसांत उष्णता अधिक जाणवत होती. आता हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे.

 

Maharashtra Rain Forecast बंगालच्या उपसागरातून छत्तीसगड, तेलंगणामार्गे विदर्भात दमट उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी आणि शनिवारी राज्यात विविध ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असताना काही ठिकाणी पाऊसही झाला.

 

👉आजच्या हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा, 👈

मराठवाड्यातील बीडमध्ये जोरदार पाऊस झाला. येथे हिंगोली जिल्ह्यातही पावसासह वीज पडून चार जनावरांचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमध्येही काल (१७ एप्रिल) सायंकाळी गारपीट झाली. सातारा जिल्ह्यातही पाऊस झाला. सांगली जिल्ह्याला गारपिटीचा फटका बसला.Hawamaan Andaaz Today

‘या’ भागासाठी पावसाचा इशारा

आता हवामान खात्याने छत्रपती संभाजीनगर, बीडसाठी आज 18 एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच शुक्रवार आणि शनिवारी म्हणजेच 19 आणि 20 एप्रिल रोजी विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा,👈

 

या भागात सर्वाधिक तापमान आहे

 

राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मालेगावमध्ये झाली आहे. आणि या ठिकाणी तापमान 43 अंशांवर पोहोचले आहे. तर जळगाव 42 अंश, परभणी 41 अंश तर सातारा, नाशिक, बारामती, छत्रपती संभाजीनार 40 अंशांच्या जवळ आहे.Hawamaan